IMG-LOGO
महाराष्ट्र

शरजील कुठेही असला, तरी त्याला अटक करूः देशमुख

Wednesday, Feb 03
IMG

पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडीओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली आहे.

मुंबई, दि. ३ फेब्रुवारी  : शरजील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला, तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, असे आश्‍वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. देशमुख यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, की पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडीओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहेत. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू. दरम्यान, शरजील उस्मानीवर पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात 153 अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी शनिवारी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तिथे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी असणार्‍या प्रदीप गावडे यांनी उस्मानीविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे.

Share: