IMG-LOGO
महाराष्ट्र

आ. प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ !

Saturday, Dec 12
IMG

ईडीने माझ्या घरी मारलेल्या छापेमारीत पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं असा खोटा दावा केला जात आहे. काही वृत्तवाहिन्या मुद्दामून असं वृत्त देत असून ते हास्यास्पद आहे. असे म्हटले आहे.

मुंबई, दि. १२ डिसेंबर  : टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत चौकशीच्या फैऱ्यात अडकलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. सोमवारी (१४ डिसेंबर) प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी हजेरी राहण्याचे आदेश दिले आहेत. आधी दोन दिवसांपूर्वीही प्रताप सरनाईकांची ईडीने तब्बल सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी प्रताप सरनाईक यांना ईडीने समन्स बजावला आहे. यात ईडीने प्रताप सरनाईक यांना येत्या सोमवारी (14 डिसेंबर) चौकशीसाठी हजर राहा, असे आदेश दिले आहेत. पण विहंग सरनाईक यांना ईडीने समन्स बजावलेला नाही.दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेनुसार ते ईडीच्या कार्यालयात गुरूवारी ( १० डिसेंबर) सकाळी ११ वाजता हजर झाले. यावेळी त्यांची सतत सहा तास चौकशी चालली. ही चौकशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालली होती. दरम्यान, आज शनिवारी सरनाईकांच्या घरी मारण्यात आलेल्या छापेमारीमध्ये पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचे वृत्त काही हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी दिलं. यानंतर, त्यांच्यावर भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत. मात्र, प्रताप सरनाईक यांनी हे आरोप फेटाळले असून असं खोटं वृत्त देणाऱ्यांवर न्यायालयीन कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. ‘ईडीने माझ्या घरी मारलेल्या छापेमारीत पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं असा खोटा दावा केला जात आहे. काही वृत्तवाहिन्या मुद्दामून असं वृत्त देत असून ते हास्यास्पद आहे. असे म्हटले आहे. 

Share: