कोरोनामुळं भक्तांविना नवरात्रउत्सव साजरा होत आहे. मात्र या स्थितीतही मंदिर संस्थानांकडून भक्तांसाठी लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तुळजापूर, दि. १७ ऑक्टोबर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्री साधेपणाने साजरी होत आहे़ त्यामुळे बाहेरील भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी तुळजापुरात प्रवेश बंदी आहे़ ९ आॅक्टोबर रोजी सुरु झालेली तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा शनिवारी पहाटे पूर्ण झाली. यानंतर पूर्ववत सिंहासनावर मूर्ती प्रतिष्ठापना करून दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते आज विधिवत घटस्थापना करण्यात आली. कोरोनामुळं राज्यात सर्व मंदिरं बंद आहेत. नवरात्रीला सर्व देवींच्या मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी होत असते. मात्र आता कोरोनामुळं भक्तांविना नवरात्रउत्सव साजरा होत आहे. मात्र या स्थितीतही मंदिर संस्थानांकडून भक्तांसाठी लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तुळजापूरची तुळजाभवानी देवी मोठं शक्तिपीठ आहे. नवरात्रीला तुळजाभवानीच्या दर्शनाला मोठी गर्दी असते. यंदा मात्र केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थिती पूजाविधी होत आहे. मात्र तुळजाभवानी संस्थानाने भक्तांसाठी 24 तास आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्याची सोय केली आहे. नवरात्रीच्या पावन पर्वाला आजपासून, म्हणजेच 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या दिवशी घटस्ठापना केली जाते. पंचागानुसार, शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घट स्थापन केले जातात आणि नवरात्राला आरंभ होतो.