एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. एखादे गाणे कठीण वाटल्यास ते ८-१० दिवसांचा वेळ मागून सराव करत.
मुंबई, दि. २५ सप्टेंबर : प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. बालासुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते. मात्र, गेल्या २४ तासांत त्यांची प्रकृती नाजूक झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. एखादे गाणे कठीण वाटल्यास ते ८-१० दिवसांचा वेळ मागून सराव करत. मात्र घाईचे काम असल्यास ते सहजपणे नकार देत. मध्यंतरीच्या काळात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतून 'विश्राम' घेतला होता. २०१३ मध्ये आलेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस'साठी त्यांनी मुख्य गाणे गायले होते. एसपी बालसुब्रमण्यम यांना कामगिरीसाठी ६ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी १६ भाषांमध्ये जवळपास ४० हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी सलमान खानसाठी अनेकदा गाणी गायली. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.