IMG-LOGO
क्रीडा

गांगुलीला हृदयविकाराचा झटका; उपचार सुरू

Saturday, Jan 02
IMG

व्यायामशाळेत व्यायाम करताना त्याची तब्येत बिघडली. हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोलकाता, दि. २ जानेवारी  : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यायामशाळेत व्यायाम करताना त्याची तब्येत बिघडली. हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share: