एकनाथ शिंदे यांची दुसरी कोविड १९ चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर डॉक्टररांनी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे.
मुंबई, दि. ०४ ऑक्टोबर : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आज रूग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. घरी जाण्याअगोदर खासदार श्रीकांत शिंदे, पोलीस आयुक्त विवेक फडणसाळकर या शिवाय इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांची दुसरी कोविड १९ चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर डॉक्टररांनी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती . त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, आज अखेरीस त्यांनी कोरोनावर मात केली.