IMG-LOGO
मनोरंजन

अभिनेता खा. सनी देओलला कोरोनाची लागण

Wednesday, Dec 02
IMG

आरोग्य सचिव अमिताभ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सनी देओला आपल्या मित्रांसमवेत मुंबईत येण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने कोरोना चाचणी केली.

मनाली, दि. २ डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता आणि गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी मंगळवारी रात्री उशीरा याबद्दल माहिती दिली.आरोग्य सचिव अमिताभ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सनी देओला आपल्या मित्रांसमवेत मुंबईत येण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने कोरोना चाचणी केली. यामध्ये त्याचा अहवाल कोरोना सकारात्मक आला. सनी देओलला कोरोना झाल्याची माहिती मंगळवारी रात्री उशीरा समजली.

Share: