हैदराबादने त्यांच्या टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, तर धोनीने मात्र चेन्नई मध्ये ३ खेळाडू बदलले आहेत.
दुबई, ०२ ऑक्टोबर : आयपीएलच्या आजच्या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. हैदराबादने त्यांच्या टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, तर धोनीने मात्र चेन्नई मध्ये ३ खेळाडू बदलले आहेत.चेन्नईच्या टीममधून मुरली विजय, ऋतुराज गायकवाड आणि जॉस हेजलवूडला वगळण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी अंबाती रायुडू, ड्वॅन ब्राव्हो आणि शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. मुंबईविरुद्धची पहिली मॅच खेळल्यानंतर अंबाती रायुडू दुखापतग्रस्त झाला होता, तर ब्राव्होला दुखापतीमुळे एकही मॅच खेळता आली नव्हती.