IMG-LOGO
महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अनपेक्षित : मंत्री प्राजक्त तनपुरे

Friday, Aug 28
IMG

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, दि. २८ ऑगस्ट : विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्ष परीक्षाबाबत घेतलेला निर्णय अनपेक्षित आहे. मात्र आम्ही या निर्णयाचा अनादर करणार नाही. या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील दिशा घेण्यासंदर्भात आजच सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. एक मोठा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, ' असा विश्वास देखील त्यांनी ट्विट करून दिला आहे.

Share: