IMG-LOGO
क्रीडा

सूर्यकुमार यादव क्लास खेळाडू : ब्रायन लारा

Monday, Nov 23
IMG

'सूर्यकुमार, रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायचा. सलामीवीरांनंतर तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज हा सर्वश्रेष्ठ फलंदाज असतो.

मुंबई, दि. २३ नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात सूर्यकुमार यादवला स्थान न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर सुरु झालेला वाद अजुनही सुरुच आहे. आयपीएल आणि रणजी क्रिकेटमध्ये बहारदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारकडे निवड समिती गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुर्लक्ष करत आहे. 'सूर्यकुमार, रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायचा. सलामीवीरांनंतर तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज हा सर्वश्रेष्ठ फलंदाज असतो. तसेच विश्वासूही असतो. सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होईल, अशी आशा होती', असंही लारा म्हणाला. 'सूर्यकुमार क्लास खेळाडू आहे. जे फलंदाज धावा करतात मी त्याच फलंदाजांना पाहत नाही. तर मी त्यांची फलंदाजी करण्याची पद्धत, कुवत आणि ते दबावत्मक परिस्थितीत कशी कामगिरी करतात हे पाहतो.

Share: