सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत (आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता.
मुंबई, दि. ०३ ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसल्याचा अहवाल एम्सने दिला आहे. सुशांतचा मृत्यू पंख्याला लटकून आत्महत्या केल्यामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे असं एम्सच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी स्पष्ट केलं.सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत (आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले. एम्सच्या या विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा अहवाल सादर केला. या अहवालानुसार सुशांतवर कुठलाही विषप्रयोग करण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर त्यांनी आता सुशांतच्या हत्येची शक्यताही नाकारली आहे. सगळ्या तपासाअंती सुशांतची हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, तर सगळ्या गोष्टी त्याने आत्महत्या केली असावी याकडेच इशारा करतात, असे त्यांनी म्हटले आहे.