IMG-LOGO
महाराष्ट्र

माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दहाव्या संशयिताला अटक

Sunday, Oct 20
IMG

दोघेही अद्याप फरार आहेत. न्यायालयाने सर्वांना २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई, दि. २० :  माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील दहाव्या संशयिताला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. संशयित भगवंत सिंगला बेलापूर, नवी मुंबई परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, भगवंत सिंह उदयपूरहून मुंबईला एका संशयितासोबत शस्त्रे घेऊन गेला होता. तो सुरुवातीपासून शूटर्स आणि कट रचणाऱ्यांच्या संपर्कात होता. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचचे १५ पथक वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. एक दिवस अगोदर १९ ऑक्टोबर रोजी पाच संशयिताना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी डोंबिवलीतून नितीन सप्रे, पनवेलमधून रामफुलचंद कनोजिया, संभाजी किशोर पारधी, प्रदीप दत्तू ठोंबरे आणि चेतन पारधी यांना अंबरनाथमधून अटक केली होती. हे सर्व लोक मुख्य सूत्रधार शुभम लोणकर आणि सूत्रधार मोहम्मद जीशान अख्तर यांच्या संपर्कात होते. दोघेही अद्याप फरार आहेत. न्यायालयाने सर्वांना २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Share: