IMG-LOGO
मनोरंजन

'बॅड बॉय बिलेनिअर्स'चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन झाला गायब

Monday, Aug 31
IMG

भ्रष्टाचारांचा आढावा घेणारा माहितीपट (वेबसीरिज) नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मने तयार केला असून येत्या २ सप्टेंबर रोजी तो प्रदर्शित होणार आहे.

मुंबई, दि. ३० ऑगस्ट : भारतातील कुप्रसिद्ध शक्तिशाली भांडवलदारांच्या भ्रष्टाचारांचा आढावा घेणारा माहितीपट (वेबसीरिज) नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मने तयार केला असून येत्या २ सप्टेंबर रोजी तो प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी त्याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. मात्र, आता हा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन काढून टाकण्यात आला आहे. चोक्सी हा गितांजली जेम्सचा प्रमोटर असून त्याचा भाचा नीरव मोदी हा १४ हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे. नीरव मोदीने गेल्या वर्षी भारतातून पलायन केले असून त्याच्याकडे ‘अँटिगुआ’ आणि ‘बार्बुडा’ या देशांचे नागरिकत्व आहे.नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलेल्या या वेब सीरिजच्या पोस्टरमध्ये चोक्सीचा भाचा आणि पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी, सहारा ग्रुपचा सुब्रतो रॉय, एसबीआयला ९ हजार कोटींचा चुना लाऊन फरार झालेला किंगफिशर एअरलाइन्सचा चेअरमन विजय मल्ल्या आणि सत्यम घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी रामलिंगा राजू यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. त्यामुळे ही वेबसीरिज सध्या चर्चेत आहे.

Share: