IMG-LOGO
क्रीडा

Tokyo Olympic : मीराबाई चानूची रौप्यपदकाची कमाई

Sunday, Jul 25
IMG

मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे.

नवी दिल्ली,, दि. २५  जुलै : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्याच दिवशी भारताच्या महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं ४९ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदकाची कमाई करुन दिली. पदकाची मानकरी होताच मीराबाईनं गेल्या पाच वर्षांपासून बाळगलेलं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. तर 49 किलोग्राम वर्गात चीनच्या जजिहु हिने सुवर्ण पदक पटकावलं आहे. 49 किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुआत स्नॅच राउंडने झाली. ज्यात मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन उचललं. ज्यानंतर दुसर्‍या प्रयत्नात 87 किलोग्राम वजन उचलंल. तिसर्‍या प्रयत्नात तिने 89 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ 87 किलोग्रामच उचलू शकली. त्यामुळे स्नॅच राउंडमध्ये ती दुसरी आली. त्यात चीनच्या जजिहु हिने 94 किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर क्लीन अँड जर्क राउंडची सुरुवात झाली आमि मीराबाईने पहिल्या प्रयत्नातच अप्रतिम कामगिरी करत 110 किलो वजन उचलला. त्यानंतर दुसर्‍या प्रयत्नात 115 किलो वजन उचललं. पण अखेरच्या तिसर्‍या प्रयत्नात 117 किलो वजन उचलण्यात ती अयशस्वी ठरली. ज्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

Share: