IMG-LOGO
क्रीडा

Tokyo Olympics: पी व्ही सिंधूची विजयी सुरुवात

Sunday, Jul 25
IMG

ग्रुप स्टेज मॅचमध्ये पी व्ही सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव केला.

टोकियो, दि. २५  जुलै : भारताची स्टार महिला बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकची सुरुवातच विजयाने केल्यामुळे तिच्या पदक जिंकण्याच्या आशा आणखी पल्ल्वीत झाल्या आहेत.ग्रुप स्टेज मॅचमध्ये पी व्ही सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव केला. पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाचा २१-७, २१-१० असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. फक्त २९ मिनिटांत पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाला पराभवाची धूळ चाखली आहे.

Share: