पहिल्या सेटमध्ये सानिया - अंकिता प्रतिस्पर्ध्यांवर पूर्णतः वरचढ ठरल्या. परंतु दुसऱ्या सेटमध्ये कचनोक बहिणींनी स्पर्धेत बरोबरी केली.
टोकिओ, दि. २५ जुलै : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाला महिला मिश्र गटात पराभव पत्करावा लागला. सानिया आणि अंकिताच्या पराभवानंतर टोकिओ ऑलंपिकच्या टेनिस स्पर्धेमध्ये सुमित नागलच्या रुपात एकमेव आशा उरली आहे.पहिल्या सेटमध्ये सानिया - अंकिता प्रतिस्पर्ध्यांवर पूर्णतः वरचढ ठरल्या. परंतु दुसऱ्या सेटमध्ये कचनोक बहिणींनी स्पर्धेत बरोबरी केली. दोघींनी पहिला सेट 6-0 च्या फरकाने जिंकला. पण त्यानंतर पुढील दोन सेट गमावले. पहिला सेट जिंकणारी ही जोडी दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये 6-7(0) 8-10 च्या फरकाने पराभूत झाली. ज्यामुळे महिला डबल्समधील पहिल्या फेरीतील सामना 6-0, 6-7(0), 8-10 च्या फरकाने भारताच्या हातातून गेला.