शालिमार एक्स्प्रेसचे एस टू आणि पार्सलचे दोन डबे ट्रॅकवरून खाली उतरले.
नागपूर, दि. २२ : नागपूरजवळ शालिमार-कुर्ला शालिमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. देशात वारंवार रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यानंतर नागपूरमध्ये एक्स्प्रेसचा डबे घसरल्याची घटना घडली आहे. शालिमार एक्स्प्रेसचे एस टू आणि पार्सलचे दोन डबे ट्रॅकवरून खाली उतरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, शालिमार एक्स्प्रेसचे एस २ आणि पार्सलचे दोन डबे रुळावरून खाली उतरले आहेत. कुर्ला- शालिमार एक्स्प्रेस नागपुरातून जात असताना कळमना भागातून काही अंतरावर अचानक रेल्वेचे दोन डबे रुळावरून खाली उतरले. यात एस टू आणि पार्सलचा एक डबा आहे. शालीमार एक्सप्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.