खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असा करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
रत्नागिरी, दि. ७ फेब्रुवारी : बाळासाहेब ठाकरे तर गेले; पण आता शिवसेनेचे नेते राजकारणासाठी त्यांची तत्वे तोडत आहेत. ते तत्वासाठी राजकारणात आलेले नसून राजकारणासाठी तत्व तोडणारे आहेत,अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यानी शिवसेनेवर हल्लाबोल केला. जनादेशाचा आदर न करता आम्ही वचन तोडले असे खोटेनाटे सांगून आम्हाला बदनाम केले. दगाबाजी केली. आम्ही जनादेशाचा अनादर केलेला नसून त्यांनीच जनादेशाचा अनादर केला. सत्तेसाठी लाचारी पत्करली, अशी टीका त्यांनी केली. खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असा करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यात तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार तयार झाले असून या ओटोरिक्षाचे प्रत्येक चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे, असे म्हणत सरकारमधील तीन पक्षांमध्ये समन्वय आणि एकवाक्यता नसल्याचे शाह यांनी सूचित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी पोस्टर्स लावून तत्वासाठी मते मागितली; मात्र त्यांनी नंतर दगाबाजी केली. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती, असे ते म्हणाले.बंद खोलीत चर्चा करीत नसतोतुम्ही म्हणता, की मी बंद खोलीत वचन दिले; मात्र मी बंद खोलीत कधीही वचन देत नसतो, तर खुलेआम वचन देतो. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेशी कोणत्याही प्रकारचे बोलणे झालेले नव्हते, असे सांगून प्रचाराच्या वेळी तसे का बोलला नाहीत, असा सवाल शाह यांनी केला. नितीशकुमार यांना दिलेले वचन आम्ही पाळले, असे त्यांनी आवर्जून सांगितले.