IMG-LOGO
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटले, संजय राऊत यांचा अमित शाह यांना फोन; राऊत स्पष्टच बोलले

Monday, Oct 21
IMG

कोणी आमच्यावर कोणी शंका घेत असतील, तर ते एका बापाची औलाद नाहीत. त्यांनी त्यांचा बाप दाखवावा अन्यथा श्राद्ध घालावं” असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई, दि. २१ : उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि संजय राऊत यांनी अमित शाह यांना फोन केला अशी माहिती काही वेळापूर्वी व्हायरल झाली होती. ज्याबाबत विजय वडेट्टीवार यांनीही स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर या पाठोपाठ शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.संजय राऊतांची अमित शाह यांच्याशी भेट झाली हे सांगितलं जातंय, ही हास्यास्पद गोष्ट आहे. काँग्रेस नेते असे दावे करत असतील तर त्यांचंही आश्चर्य वाटतं आहे. शिवसेनेने फक्त संघर्ष केलेला नाही, तर आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आमचा पक्ष फोडला, आमचं सरकार पाडलं. आमचं चिन्ह त्यांनी चोरलं. त्याही पेक्षा हा महाराष्ट्र त्यांनी गद्दारांच्या हातात दिला. या वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. कोणी आमच्यावर कोणी शंका घेत असतील, तर ते एका बापाची औलाद नाहीत. त्यांनी त्यांचा बाप दाखवावा अन्यथा श्राद्ध घालावं” असं संजय राऊत म्हणाले.

Share: