काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्याशीही ठाकरेंची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
मुंबई, दि. २३ : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ४ ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर येत असून ते विरोधी पक्षनेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे समजते. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.