असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते.
मुंबई, दि. ३१ : मुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली. एक तर तू राहशील किंवा मी राहीन अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर इशारा दिला आहे. तसंच हात उगारला त्याचा हात जागेवर ठेवायचा नाही, आदेश पाहिजे तर आदेश देतो असंही ते म्हणाले आहेत. सरकार गेल्यावर तिघंही आपापल्या गावी जातील असा टोला यावेळी त्यांनी लगावला."लढाईला तोंड फुटत आहे. हर हर महादेव ही महत्वाची घोषणा आहे. लोकसभेत आणखी विजयाची अपेक्षा होती. अमोलही जिंकलाच आहे. अखिलेश, ममता बॅनर्जी यांची भेट झाली. अनेकजण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली. आम्ही असेच आहोत. वाकडे गेलात की तोडू. भाजपा म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहे. असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.