IMG-LOGO
क्रीडा

वेगवान धावपटू उसेन बोल्ट कोरोना बाधित

Tuesday, Aug 18
IMG

बोल्टच्या त्या वाढदिवसाच्या पार्टीत इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू रहिम स्टर्लिगदेखील उपस्थित होता.

किंग्सटन, दि. २५ ऑगस्ट : सोशल डिस्टेंसिंगचे कोणतेही नियम न पाळता मित्रमंडळींसोबत जमैकाचा जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्ट याने नुकताच ३४ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर बोल्टला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बोल्टच्या त्या वाढदिवसाच्या पार्टीत इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू रहिम स्टर्लिगदेखील उपस्थित होता. बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठय़ा संख्येने त्याची मित्रमंडळी उपस्थित होती आणि एकत्र जल्लोष करत होती. मी कोरोना पॉझिटिव्ह झालो आहे. आता मी विलगीकरण कक्षात आहे. मी आता मित्रांपासून दूर राहणार आहे. सध्या मला कोणतेही लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले आहे. असे ट्विट उसेन बोल्टने केले आहे.

Share: