IMG-LOGO
मनोरंजन

उत्तर प्रदेश सरकार उभारणार सर्वात मोठी फिल्मसिटी ; मधुर भंडारकर यांनी मुख्यमंत्री योगींची घेतली भेट

Sunday, Sep 20
IMG

देशातील सगळ्यांत मोठी आणि सुंदर फिल्म सिटी उभारण्यासाठी जागा शोधण्याचे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अलाहाबाद, दि. २० सप्टेंबर :  देशातील सगळ्यांत मोठी आणि सुंदर फिल्म सिटी उभारण्यासाठी जागा शोधण्याचे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनी रविवारी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. या वेळी दोघांनी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि सुंदर अशा फिल्म सीटी संबंधित मुद्द्यावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी फिल्म निर्माते भंडारकर यांना भेट स्वरुपात एक नाणे दिले. त्यावर भगवान श्रीराम यांचा फोटो साकारण्यात आला  आहे. त्याचसोबत रामचरितमानसची एक प्रत, तुळशीपत्रांची माळ आणि एक भव्य कुंभ कॉफी टेबल सुद्धा दिले. जे गेल्या वर्षात प्रयागराज मध्ये आयोजित केले होते. देशाला एका चांगल्या फिल्म सीटीची गरज आहे. उत्तर प्रदेश ही जबाबदारी घेण्यास तयार आहे. आम्ही येथे एक भव्य फिल्म सिटीची उभारणी करु. फिल्मसिटीसाठी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवेचे क्षेत्र चांगले ठरेल. ही फिल्मसीटी चित्रपट निर्मात्यांना चांगली संधी मिळवून देणार आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. लवकरच यावर काम सुरु करण्यात येईल असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. या निर्णयावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने ट्विट करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.कंगना रनौतने ट्वीट केलं आहे की, 'लोकांचा असा समज आहे की, भारतात हिंदी फिल्म इंडस्ट्री सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. जो अत्यंत चुकीचा आहे. तेलगु फिल्म इंडस्ट्रीने सिद्ध केलं असून ती सध्या टॉपवर आहे. आणि तेलगु फिल्म इंडस्ट्रीमधील चित्रपट आता अनेक भाषांमध्ये रिलीज करण्यात येत आहेत. तसेच अनेक हिंदी चित्रपटांचं शुटींग हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये केलं जातं.कंगना पुढे म्हणाली, 'योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या घोषणेचं मी समर्थन करते. आम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक रिफॉर्म्सची गरज असते. सर्वात आधी आपल्याला एका मोठ्या फिल्म इंडस्ट्रीची गरज आहे. जी भारतातील चित्रपट उद्योग म्हणून ओळखली जाईल. 

Share: