मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
पुणे, दि. १७ : कोल्हापूर ते पुणे या दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. शालेय मुलांसह, पत्रकार आणि काही कोल्हापूकरांनी या ट्रेनने प्रवास केला. आता कोल्हापूर ते मुंबई अशीच ट्रेन सुरु करा अशी अपेक्षा काही कोल्हापूरकरांनी व्यक्त केली आहे. तसंच आज पुणे ते हुबळी या दरम्यानही वंदे भारत ( Vande Bharat ) ट्रेन सुरु करण्यात आली. या कार्यक्रमाला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती. वंदे भारत एक्स्प्रेस सोमवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सुटेल, दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पुणे स्थानकांवर पोहचेल. प्रत्येक बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवशी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी वंदे भारत ( Vande Bharat ) ट्रेन सुटेल जी संध्याकाळी ७.४० ला कोल्हापुरात पोहचेल. वंदे भारत ट्रेनला ( Vande Bharat ) मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.