IMG-LOGO
मनोरंजन

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

Sunday, Dec 06
IMG

अनेक चित्रपटांतून त्यांनी गावचा 'पाटील', 'पोलिस आयुक्त', 'न्यायाधीश' किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्या भूमिका साकारल्या. काही चित्रपटांमध्ये त्यांनी वडील किंवा भाऊ अशाही भूमिका साकारल्या.

मुंबई, दि. ६ डिसेंबर : आज सकाळी मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली असून हृदयविकाराच्या झटक्यामुळे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी ५ डिसेंबर रोजी रात्री त्यांचे निधन झाले.रवी पटवर्धन यांच्या मागे पत्नी नीता, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. रविवारी दुपारी निवडक चाहत्यांच्या उपस्थित पटवर्धन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छातीत दुखू लागल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. रवी पटवर्धन यांनी केवळ चित्रपट नव्हे तर अनेक नाटकांमधून अभिनय केला. खरे तर रवी पटवर्धन हे पहिल्यांदा नाट्यअभिनेते होते. त्यानंतर ते चित्रपट अभिनेते होते. अनेक चित्रपटांतून त्यांनी गावचा 'पाटील', 'पोलिस आयुक्त', 'न्यायाधीश' किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्या भूमिका साकारल्या. काही चित्रपटांमध्ये त्यांनी वडील किंवा भाऊ अशाही भूमिका साकारल्या. त्यांनी जवळपास १५० पेक्षा अधिक नाटकं आणि जवळपास १०० हुन अधिक चित्रपटांतून भूमिका साकारल्या.

Share: