IMG-LOGO
मनोरंजन

दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन

Sunday, Nov 15
IMG

सौमित्र चॅटर्जी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कोलकाता, दि. १५ नोव्हेंबर :  बंगाली रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे आज, रविवारी दुपारी 12.15 वाजता निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. गेल्या 6 ऑक्टोबर रोजी कोरोनाग्रस्त झाल्यामुळे त्यांना कोलकाता येथील 'बेले व्यू क्लिनिक' या खसगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 40 दिवसांपासून आजारी असलेल्या चॅटर्जी यांनी आज अखेरचा श्वास घेतला.सौमित्र चॅटर्जी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी त्यांनी कोरोना संक्रमणाला पराभूत केले. परंतु, सौमित्र चटर्जी यांना श्वासोच्छवासात अडथळे जाणवू लागले होते.

Share: