पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे.
मुंबई, दि. ४ डिसेंबर : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक होती. शिवाय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढवलेलीही ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपची निवडणूक जिंकण्यासाठीची रणनीती यशस्वी होणार की दोन वेगळ्या विचारधारेच्या आघाडीला मतदार स्वीकारतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मतदारांनी पदवीधरच्या 6 पैकी 4 जागांचं दान आघाडीच्या पदरात पाडल्यानं भाजपला सपशेल नाकारल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे. दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून हाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरीष बोराळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये सतीश चव्हाणांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.पदवीधर मतदारसंघनागपूर- अभिजित वंजारी, काँग्रेस-विजयी, भाजपाच्या संदीप जोशी यांचा पराभव, औरंगाबाद- सतीश चव्हाण, राष्ट्रवादी - विजयी, भाजपाच्या शिरिष बोराळकर यांचा पराभव, पुणे - अरुण लाड, राष्ट्रवादी- विजयी, भाजपाच्या संग्राम देशमुखांचा पराभवशिक्षक मतदारसंघपुणे- जयंत आसगावरकर, काँग्रेस -विजयी, भाजपा समर्थित अपक्ष जितेंद्र पवार पराभूत, अमरावती- अपक्ष विकरण सरनाईक- विजयी, शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडे आणि भाजपाच्या नितीन धांडेंचा पराभव, स्थानिक स्वराज्य संस्थाधुळे- भाजपाच्या अमरिश पटेल यांचा विजय, काँग्रेसच्या अभिजीत पाटील यांचा पराभव