IMG-LOGO
महाराष्ट्र

गृहनिर्माण क्षेत्रातही वसुलीसाठी वाझे गँग!

Thursday, Apr 01
IMG

आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, बीएमसी येथे 100 बिल्डरची यादी, 100 आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रवीण कलमे हे केले काही महिने वसुली गँग चालवत आहेत.

मुंबई, दि. १ एप्रिल :   गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला शंभर  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यामुळे राजकारणात उडालेला धुराळा अद्याप शमलेला नाही. अशा स्थितीत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केला. गृहनिर्माण खात्यातही मोठे वसुली रॅकेट सुरू असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, बीएमसी येथे 100 बिल्डरची यादी, 100 आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रवीण कलमे हे केले काही महिने वसुली गँग चालवत आहेत. त्याबाबत सोमय्या यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या वेळी काही पुरावेही दिल्याचा दावा सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. शंभर रुपये प्रतिफूट हा सध्याचा एसआरए, म्हाडाचा बिल्डरांसाठी दर चालत आहे. आव्हाड यांचे वाझे म्हणजे प्रवीण कलमे हे महापालिका, म्हाडा, एसआरए मध्ये 100 बिल्डर्सच्या विरोधात शंभर आरटीआय करतात. त्यावर आव्हाड त्वरित अहवाल सादर करावा असे आदेश देतात. लगेच एसआरए असो, म्हाडा असो यांचे ‘वसुली गँग’चे अधिकारी कामाला लागतात. प्रवीण कलमेला घेऊन हे अधिकारी प्रत्यक्ष साईट व्हिजीट करतात. ठाकरे सरकारची अजून एक वसूली गँग. या प्रकरणात मंत्रालयात तक्रार केल्यानंतर काही दिवस ही वसुली गँग शांत होती. आता पुन्हा वसुली गँगचे काम जोरात सुरु आहे. कलमे हे ‘अर्थ’, ‘आकांक्षा’ या बोगस एनजीओच्या नावाने पत्र देतात आणि गृहनिर्माण मंत्री त्याच्यावर निर्देश देतात, असा आरोप सोमय्या यांनी केला.सोमय्या यांनी या प्रकरणात प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार आणि 100 पानांचे पुरावे दिले आहेत. त्याचबरोबर आव्हाड, प्रवीण कलम, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकारी, म्हाडाचे अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

Share: