स्वाती सोन्नर असे निलंबन झालेल्या वाहतूक पोलिस महिलेचे नाव आहे. त्या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत.
पुणे, दि. १८ डिसेंबर : वाहतूक नियमन करताना एका महिला वाहतूक पोलिसाने अनोख्या पद्धतीने लाच स्वीकारली. संबंधित कर्मचारी थेट खिशात पैसे घेत असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरून 'कसुरी अहवाल' वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले.स्वाती सोन्नर असे निलंबन झालेल्या वाहतूक पोलिस महिलेचे नाव आहे. त्या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत. सोन्नर आणि त्यांचे सहकारी वाहतूक पोलिस मंगळवारी (ता.१५) पिंपरी मधील साई चौकात कर्तव्य बजावत होत्या. दरम्यान, तिथे एका दुचाकीवरून दोन तरुणी आल्या. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित वाहतूक पोलिस महिलेने त्यांना सांगितले. ही कारवाई टाळण्यासाठी काही रक्कम घेण्याचे ठरले. त्यानंतर पोलिस महिलेने ती रक्कम स्वीकारली.