झी मराठी वाहिनीची महाराष्ट्राची लावण्यवती ही स्पर्धा आज रात्री रंगली. या स्पर्धेत नाशिकची शिरीन विजेती तर नाशिकचीच क्षमा देशपांडे उपविजेती ठरली.
मुंबई, दि. १ फेब्रुवारी : आणि विजेती आहे शिरीन दत्ता पाटील... हा आवाज झी मराठीच्या रंगमंचावर घुमला आणि तमाम नाशिककरांचा ऊर अभिमानाने भरून आला. झी मराठी वाहिनीची महाराष्ट्राची लावण्यवती ही स्पर्धा आज रात्री रंगली. या स्पर्धेत नाशिकची शिरीन विजेती तर नाशिकचीच क्षमा देशपांडे उपविजेती ठरली. अंतिम बारामध्ये शिरीन व क्षमा यांनी बाजी मारल्याने तमाम नाशिककरांचे डोळे या इव्हेंटकडे लागले होते.