स्टेडियमचे वैशिष्ट्य म्हणजे हे देशातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. एक लाख दहा हजार प्रेक्षकांना बसण्यासची क्षमता या स्टेडियम मध्ये आहे.
अहमदाबाद, दि. २४ फेब्रुवारी : गुजरातमधील अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेलं जगातील सर्वात मोठं क्रिकेट मैदान मोटेरा स्टेडियमचं नाव बदलण्यात आलं आहे. हे मैदान आता नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणून ओळख जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. यापूर्वी या मैदानाचं नाव सरदार पटेल स्टेडियम असं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन झालं. दरम्यान अमित शहांनी उदघाटनावेळी मोदींच्या नावाची घोषणा केली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियमवर संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या स्टेडियमचे वैशिष्ट्य म्हणजे हे देशातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. एक लाख दहा हजार प्रेक्षकांना बसण्यासची क्षमता या स्टेडियम मध्ये आहे. फक्त हेच नाही, ड्रेनेज सिस्टम देखील चांगली आहे जी 30 मिनिटांत खेळपट्टी कोरडे करू शकते. याशिवाय, स्टेडियममध्ये 11 खेळपट्ट्या आहेत, त्यातील 6 लाल मातीने बनविलेल्या आहेत.