IMG-LOGO
मनोरंजन

कंगनाचे वादग्रस्त ट्विट; 'ममता बॅनर्जी रक्ताची भुकेली राक्षसीणच'

Tuesday, May 04
IMG

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अभिनेत्री कंगनाने वादग्रस्त ट्विट केले आहे.

मुंबई, दि. ४ मे : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अभिनेत्री कंगनाने वादग्रस्त ट्विट केले आहे. नेहमीच आपल्या ट्विटमुळे चर्चेत असलेल्या बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने याच मुद्यावर कंगनाने ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने ममता बॅनर्जींची तुलना त्राटिका या राक्षसीसोबत केली. त्यामुळे सध्या ती पुन्हा ट्रोल होत आहे. तिने ट्विट केले आहे की,' 'मी चूक होती. ती रावण नाही. रावण महान राजा होता. त्याने जगातील सर्वात श्रीमंत देश निर्माण केला होता. महान प्रशासक, बुद्धिमान, वीणावादक असा शक्तिशाली राजा होता. पण ही रक्ताची भुकेली राक्षसीण त्राटिका आहे. ज्या लोकांनी हिला मत दिले, त्यांचेही हात रक्ताने माखलेले आहेत.' याआधी केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने ममता बॅनर्जींची तुलना रावणाशी केली होती.

Share: