IMG-LOGO
मनोरंजन

लोकप्रिय अभिनेत्रीची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Wednesday, Dec 09
IMG

चित्राला नैराश्याने ग्रासले असल्याचे बोलले जाते. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चेन्नई, दि. ९ डिसेंबर  :  तमिळ मनोरंजन विश्वातील छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेत्री वीजे चित्राने हॉटेलच्या रुममध्येच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून तमिळ चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.चेन्नईतील नसरप्रीत भागात असलेल्या हॉटेलमध्ये चित्रा थांबली होती. या हॉटेलमध्येच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. चेन्नईतील प्रसिद्ध उद्योगपतीसोबत नुकताच तिचा साखरपुडा झाला होता. विजय टीव्हीवर सुरु असलेल्या पॅनडियन स्टोअर्स या मालिकेतील तिची मुख्य व्यक्तिरेखा चांगलीच गाजत होती. चित्राने साकारलेली मुल्लई ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. चित्राला नैराश्याने ग्रासले असल्याचे बोलले जाते. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

Share: