IMG-LOGO
महाराष्ट्र

त्यांना केवळ त्यांची सत्तेची खुर्ची प्रिय : अंबादास दानवे यांची राज ठाकरेंवर टीका

Saturday, Jul 27
IMG

केवळ त्यांची सत्तेची खुर्ची प्रिय आहे. म्हणून तर ते लोक या सगळ्या योजना घेऊन येत आहेत.”

मुंबई, ‍‍दि. २६ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आगामी विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. मनसे सत्तेत आली पाहिजे, यासाठी आपण २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत, अशी घोषणाच त्यांनी केली. त्यावर उद्गधव ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. अंबादास दानवे म्हणाले, “लाडका भाऊ, लाडकी बहीण असं करणाऱ्याला लाडक्या सुपार्‍या जास्त प्रिय दिसतात. आपण त्यांचं (राज ठाकरे) गेल्या १० ते २० वर्षांमधलं राजकारण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी केवळ सुपार्‍यांचं राजकारण केलं आहे. त्यामुळे त्यांना सुपारी घेणारे आणि देणारे अधिक प्रिय आहेत. त्यातच त्यांनी संघटना फोडण्याचे पाप आपल्या डोक्यावर घेतलं आहे आणि आता निवडणूक आल्यावर लाडका भाऊ, लाडकी बहीण आठवू लागली आहे. राज्य सरकारचं ही तसंच आहे. आता ते लाडका भाऊ, लाडकी बहीण घेऊन बसले आहेत. खरंतर त्यांना भाऊ किंवा बहीण प्रिय नाही. त्यांना केवळ त्यांची सत्तेची खुर्ची प्रिय आहे. म्हणून तर ते लोक या सगळ्या योजना घेऊन येत आहेत.”

Share: