श्रावण सरी आणि मंगळागौर या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
मुंबई, दि. १७ : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे रक्षाबंधनाचं गिफ्ट आहे. हे पैसे महिलांच्या बचत खात्यात यायला लागले आहेत. त्यांची छोटी मोठी गरज असले, त्यांना यातून हातभार लागेल. हीच सरकारची इच्छा आहे. स्टंटमॅन लोकांनी हे नको सांगायला कोणी काय करतंय. हे लोकांसाठी काम करतंय. स्टंटमॅन लोकांनी नको सांगयला की हे स्टंट सुरू आहेत”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर टीका केली जातेय. या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना ही योजना का राबविली जातेय असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. तसंच, ही योजना फक्त पुढील दोन महिनेच सुरू राहणार असल्याचंही विरोधकांकडून सांगण्यात येतंय. यावर अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. श्रावण सरी आणि मंगळागौर या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आली असल्याचे त्यांनी सांगितले.