रामपालला चौकशीसासाठी १६ डिसेंबरला एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र तो परदेशात असल्याचं त्याने वकिलांमार्फत एनसीबीला कळवलं होतं.
मुंबई, दि. २१ डिसेंबर : बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अनेक मोठ्या अभिनेत्यांची नावं समोर आली. यामध्ये अभिनेता अर्जुन रामपाल याचंही नाव समोर आलं होतं.अर्जुन अर्जुन रामपाल लंडनहून परतण्याची प्रतिक्षा एनसीबी करत होती. तो परतल्यानंतर आज २१ डिसेंबर रोजी त्याची चौकशी करण्यात आली. आज एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अर्जुन रामपालची चौकशी केलीये. दुपारी १२ वाजता अर्जुन चौकशीसाठी हजर झाला होता. जवळपास ६ तास एनसीबीकडून अर्जुनची चौकशी करण्यात आली. रामपालला चौकशीसासाठी १६ डिसेंबरला एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र तो परदेशात असल्याचं त्याने वकिलांमार्फत एनसीबीला कळवलं होतं.