IMG-LOGO
महाराष्ट्र

बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Sunday, Oct 13
IMG

बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबई, दि. १३  :  अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.  मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगरमधील राम मंदिर परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले. बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानातून स्मशानात नेण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मुस्लिम रितीरिवाजांनुसार बडा कब्रस्तान येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूड कलाकारांसह राजकीय नेत्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. 

Share: