IMG-LOGO
महाराष्ट्र

त्याला साधा फटाका फोडता येत नाही,तो बंदूक काय चालवणार; आरोपी अक्षय शिंदेच्या आईचा सवाल

Monday, Sep 23
IMG

ज्या हॉस्पिटलला ठेवलंय तिथे आम्ही येतो, आम्हालाही गोळ्या घाला. आम्ही पण मरायला तयार आहे.

बदलापूर, दि. २३ : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्या केली नसून त्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचे समोर आले आहे. अक्षयने एपीआय निलेश मोरे यांच्यावर ३ ते ४ राऊंड फायर केले. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षण करण्यासाठी त्याच्यावर उलट गोळीबार केल्याने अक्षयचा मृत्यू झाला.  मात्र,या घटनेवर अक्षयच्या आई वडिलांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. माझ्या मुलाला पैसे देऊन मारून टाकण्यात आलं आहे. त्याला साधा फटाका फोडता येत नाही, तो बंदूक काय चालवणार? असा सवाल करत या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे.अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याची माहिती मिळताच त्याच्या आईने टाहो फोडला आहे. त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांवर आरोप केला आहे. त्याच्या आईने म्हटले की, माझा पोरगा फटका फोडू शकत नाही. तो बंदूक काय चालवणार? तो गाड्यांनाही घाबरायचा. आम्ही रोजचं काम करून जगणारे लोकं आहोत. आम्हीही आता जगणार नाही. आमच्या पोरासोबतच जाणार आहोत. मी आजच त्याची भेट घेतली होती. त्याच्या हातामध्ये कुठले तरी पेपर होते, त्याला लिहून दिलेले. तो दाखवत होता मला. पण आम्हाला लिहियला वाचायला येत नाही. आम्ही शिकलेले नाही.पैसे देऊन मारून टाकलं माझ्या पोराला. त्याला ज्या हॉस्पिटलला ठेवलंय तिथे आम्ही येतो, आम्हालाही गोळ्या घाला. आम्ही पण मरायला तयार आहे. 

Share: