IMG-LOGO
महाराष्ट्र

महायुतीचे काम करायचे आहे, त्यागासाठी तयार रहा; एकनाथ शिंदेंच्या खासदारांना सूचना

Wednesday, Mar 20
IMG

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनि एकत्रितपणे महायुती म्हणून काम करायचं असून, वेळप्रसंगी त्याग करण्यासाठी तयार राहा असं इशारावजा वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना खासदारांना दिला.

ठाणे, दि. २०  : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांची बैठक मंगळवारी सकाळी पार पडली. यावेळी महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी एकजुटीने लढण्यावर तसेच ४५ प्लस जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. त्याचबरोबर शिवसेनेला १३ ते १४ जागा मिळतील, असा देखील सूर बैठकीत निघाल्याचे समजते. यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, मावळचे श्रीरंग बारणे, पालघरचे राजेंद्र गावित आदी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनि एकत्रितपणे महायुती म्हणून काम करायचं असून, वेळप्रसंगी त्याग करण्यासाठी तयार राहा असं इशारावजा वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना खासदारांना दिला. उमेदवार कोणताही असला तरीही तो महायुतीचा उमेदवार आहे या भावनेनं त्याच्यासाठी काम करण्याचा आग्रही सूर त्यांनी आळवला. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून लोकसभा सदस्याना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने काही खासदारांना उमेदवारी नाकारली असताना महायुतीमधील घटक पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. त्यात शिवसेनेच्या काही जागांवर भाजपकडून दावा ठोकण्यात आल्याने विद्यमान खासदारांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या काही खासदारांना उमेदवारी नाकारून सक्षम अशा विद्यमान मंत्र्यांना रिंगणात उतरविण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही जागांबाबत जाहीर वक्तव्य केली जात असल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजत आहे.

Share: