आम्हाला शेवटपर्यंत आशा होती एकनाथ खडसे पक्षात राहतील पण त्यांचा निर्णय झाला असावा.
मुंबई, दि. २१ ऑक्टोबर : कोणताही नेता अथवा कार्यकर्ता पक्षातून बाहेर पडतो त्याचा आनंद निश्चित नसतो. एकनाथ खडसेंवर अन्याय झाला की नाही हा व्यक्तिसाक्षेप निर्णय असू शकतो, प्रदेशाध्यक्ष सातत्याने एकनाथ खडसेंच्या संपर्कात होते, संघटनेला कोणताही त्रास होणार नाही असा निर्णय होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले, परंतु एकनाथ खडसेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे खडसेंच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहे. आम्हाला शेवटपर्यंत आशा होती एकनाथ खडसे पक्षात राहतील पण त्यांचा निर्णय झाला असावा. संघटनेने एकनाथ खडसेंसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व केले. खडसेंना डावलून कोणताही निर्णय घेतला नाही असं केशव उपाध्ये यांनी स्पष्ट केलं.