कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांच्या मालकीची असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नागपूर, दि. १० : रविवारी मध्यरात्री नागपूरच्या सीताबर्डी भागात एका ऑडी कारनं काही वाहनांना धडक दिली. यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही. मात्र, वाहनांचं नुकसान झालेलं आहे. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. ही कार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांच्या मालकीची असल्याचं स्पष्ट झालं आहे. आधी कारची नंबरप्लेट काढून ठेवल्याचं दिसून आलं. मात्र, नंतर ही नंबरप्लेट कारमध्येच असल्याचं पोलिसांना आढळून आलं.या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना प्राथमिक वैद्यकीय उपचार देऊन लागलीच घरी सोडण्यात आल. मात्र, आता अपघातावेळी नेमकं काय घडलं? याबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे. नागपूर झोन दोनचे डीसीपी राहुल मदने यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. त्यात अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच होते, असं त्यांनी सांगितलं आहे.