राज्यात आपलंच सरकार येईल ही स्थिती आहे. मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका.
मुंबई, दि. १ : उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप पदाधिकारी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे. “उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे. त्यामुळेच त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचवले जात आहेत. मराठी आणि हिंदू मतं त्यांच्या बरोबर नाहीत. राज्यात आपलंच सरकार येईल ही स्थिती आहे. मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका.” असंही आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याचे एका मराठी वृत्त वाहिनीने हे वृत्त दिलं आहे.