IMG-LOGO
महाराष्ट्र विधानसभा २०२४

विरोधक गोंधळलेले, लाडकी बहीण योजना सुरूच असेल : देवेंद्र फडणवीस

Wednesday, Oct 16
IMG

योजना यापुढेही चालू राहतील. प्रत्येक योजनेच्या पाठिशी पूर्ण आर्थिक पाठबळ उभं करूनच आम्ही योजना जाहीर करू.

मुंबई, दि. १६ :  विरोधक एकीकडे म्हणतायत की राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि वर घोषणा करतात की त्यांचं सरकार आल्यावर ते संपूर्ण कर्जमाफी करणार आणि इतरही अनेक घोषणा करत आहेत. त्यामुळे विरोधकांनी आधी ठरवावं की सरकारडे योजनांसाठी पैसे आहेत की नाहीत? पैसे असतील तर ते पुढची कर्जमाफी करू शकतील. मात्र, आम्ही ज्या योजना आतार्यंत सांगितल्या आहेत, त्या पूर्ण विचार करून जाहीर केल्या आहेत. त्या योजना यापुढेही चालू राहतील. प्रत्येक योजनेच्या पाठिशी पूर्ण आर्थिक पाठबळ उभं करूनच आम्ही योजना जाहीर करू. मात्र विरोधक गोंधळले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद करावी असं त्यांना वाटतं. परंतु, मला एक गोष्ट सर्वांना सांगायची आहे की या निमित्ताने महाविकास आघाडीचा पर्दाफाश झाला असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. महायुती सरकारने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गेल्या अडीच वर्षांचा लेखाजोखा मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.  काँग्रेस नेते लाडकी बहीण योजना बंद व्हावी यासाठी न्यायालयात गेले आहेत. परंतु, त्यात त्यांना यश आलं नाही. त्यांच्या माजी मंत्र्याने सांगितलं की आमचं सरकार आल्यास आम्ही ती योजना बंद करू. उद्धव ठाकरे यांचं अडीच वर्षे सरकार होतं. त्या काळात त्यांनी आधीच्यासरकारने घेतलेले निर्णय रद्द केले.आताही ते तसं करू शकतात. दुसरीकडे त्यांचे नेते म्हणतात की आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २००० रुपये करू. राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू. त्यामुळे आता विरोधकांनी आधी हे ठरवावं की योजनांसाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत की नाही. त्यानंतर त्यांनी टीका करावी”. असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.  

Share: