प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर १० ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबई, दि. २४ नोव्हेंबर : ईडीने नक्की का कारवाई केली, माझ्या मुलाला का ताब्यात घेतलं, याची माहिती मीदेखील अजून घेत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर १० ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, सरनाईक यांनी 'सामना'च्या कार्यालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत आणि प्रताप सरनाईक यांच्यात साधारण दीड तास चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.