गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे.
बदलापूर, दि. २० : बदलापूरमधील एका शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. बदलापूर रेल्वे स्थानकामध्येही रेल्वे रोको आंदोलन केलं. जवळपास गेल्या ९ तासापांसून हे आंदोलन सुरु होतं. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत शांतता राखण्याचं आवाहन करत आंदोलन थांबवण्याची विनंती केली होती. मात्र, आंदोलकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. यानंतर अखेर पोलीसांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करत आंदोलकांना हटवलं. त्यामुळे तब्बल दहा तासांनी रेल्वे मार्ग मोकळा झाला. यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. “आंदोलनाच्या आडून विरोधक राजकारण करत असून काही ठरावीक लोकांना या ठिकाणी सोडून दिलं”, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला.