IMG-LOGO
महाराष्ट्र

सरपंचपदाचे आरक्षण पुढच्या महिन्यात

Tuesday, Jan 19
IMG

पाटील यांच्या खानापूर गावात भाजपची धूळधाण झाली आहे. मतदारांनी भाजप उमेदवारांना नाकारले आहे. पर्यायाने चंद्रकांत पाटलांना हा मोठा धक्का मानण्यात येतो.

कोल्हापूर, दि. १९ जानेवारी  :  राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यानंतर आता पॅनेल प्रमुखांपासून ते सदस्यांपर्यंत सगळ्यांनाच सरपंचपदाच्या आरक्षणाचे वेध लागले आहेत. अशातच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदाचे आरक्षण काढू, असे वक्तव्य केले आहे. पुढच्या एक महिन्यात हे आरक्षण काढले जाईल, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. निवडणुकीच्या अगोदर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते; मात्र निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने हे आरक्षण रद्द करत निवडणुकीनंतर आरक्षणाची सोडत काढली काढण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाच्या सोडतीवर सविस्तर भाष्य केले. तसंच राजकीय फटकेबाजीही केली. नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे आणि त्यानंतर आपले गाव, तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र सांभाळायला पाहिजे, असे म्हणत त्यांनी चंद्रकांतदादांना टोला लगावला. पाटील यांच्या खानापूर गावात भाजपची धूळधाण झाली आहे. मतदारांनी भाजप उमेदवारांना नाकारले आहे. पर्यायाने चंद्रकांत पाटलांना हा मोठा धक्का मानण्यात येतो. तसेच संबंध राज्यभर चंद्रकांत पाटील यांच्या गावात त्यांना सत्ता राखता आली नसल्याची चर्चा होती. याचाच संदर्भ घेत उद्या भाजपचेच नेते म्हणतील दादा तुमच्याच गावात तुमची सत्ता नाही, अशी कोपरखळी मुश्रीफांनी मारली. चंद्रकांतदादांच्या खानापुरात शिवसेनेने बाजी मारली. तसेच भाजपच्या अनेक दिगग्ज नेत्यांच्या गावात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जर राज्याच्या निवडणुकीचे निकाल पाहिले, तर हे लक्षात येईल, की महाविकास आघाडीची सरशी झाली आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

Share: