IMG-LOGO
महाराष्ट्र

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद, बिश्नोईच्या टोळीने स्वीकारली जबाबदारी

Sunday, Apr 14
IMG

सलमान खान तुला ट्रेलर दाखवण्यासाठी आम्ही हे केले आहे. जेणेकरून तुला आमची ताकद समजेल.

मुंबई, दि. १४ : बाॅलिवूडचा दबंग सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पहाटे गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून दोन हल्लेखोर हे दुचाकीवरून आल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. एकून पाच गोळया झाडल्या गेल्याचे समजत आहे. सलमान खानच्या घराबाहेर हा गोळीबार लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने  गोळीबाराची जबाबदारी घेतली असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही पोस्ट अनमोल बिश्नोईने शेअर केली आहे. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे. अनमोल बिश्नोईच्या पोस्टमध्ये आम्हाला शांतता हवी आहे, दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून आला तर ते योग्य आहे. सलमान खान तुला ट्रेलर दाखवण्यासाठी आम्ही हे केले आहे. जेणेकरून तुला आमची ताकद समजेल. हेच नाही तर आम्ही तुला ही शेवटची वार्निंग देतो असेही या पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे. यानंतर या गोळ्या फक्त घरावर चालणार नाहीत. असे त्यात म्हटले आहे. 

Share: