बेंगळुरू संघाने पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. तर पहिलाच सामना सुपर ओव्हरमध्ये खेळलेल्या पंजाब संघाला दिल्लीकडून पराभव स्विकारावा लागला.
दुबई, दि. २४ सप्टेंबर : आयपीएलमधील आजची लढत ही विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात होत आहे. या लढतीत विराटच्या संघाने टॉस जिंकला असून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळुरू संघाने पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. तर पहिलाच सामना सुपर ओव्हरमध्ये खेळलेल्या पंजाब संघाला दिल्लीकडून पराभव स्विकारावा लागला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अंपायरने दिलेल्या शॉर्ट रनमुळे पंजाबचा पराभव झाला होता. आता बेंगळुरूविरुद्ध विजय मिळवण्यासाठी ते उत्सुक असतील. गेल्या सामन्यात विजय प्राप्त करणाऱ्या संघात एकही बदल न करता त्याने मैदानात उतरणं पसंत केलं. पण पंजाबकडून मात्र दोन बदल करण्यात आले. पहिल्या सामन्यात खेळलेले कृष्णप्पा गौतम आणि ख्रिस जॉर्डन यांना संघाबाहेर करत मुरूगन अश्विन आणि जिमी नीशम यांना संघात स्थान देण्यात आले.