“जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
मुंबई, दि. २६ : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात एका प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यावरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. मला कारागृहात टाकल्यास भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडणुकीत पाडा, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आज पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना इशारा दिला. “जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.