मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
अंतरवाली सराटी, दि. १ : मी तुमच्यासाठी खंबीर आहे. माझी समाजाकडे काहीही अपेक्षा नाही. तुमचे पोरं मोठे करण्यासाठी मी जीव हातावर घेतला आहे. मी शेवटच्या घटकेपर्यंत मराठा समाजाला कधीही सोडणार नाही”, असं म्हणत मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले होते.मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाला संबोधित करत असताना मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.